महाराष्ट्र सरकारचा एक चांगला निर्णय अभिनंदन सरकारचे रक्ताच्या नातेवाईकांसाठी स्टॅम्पड्युटी माफ, महसूलमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा
गुरूवार, 26 मार्च 2015
मुंबई : आपल्या रक्ताच्या नातेवाईकाला स्थावर मालमत्तेची मालकी हस्तांतरित करताना आता स्टँम्पड्युटी द्यावी लागणार नाही. राज्य सरकारने मालकी हस्तांतरणाच्या नियमात बदल करुन ही स्टँम्पड्यूटी रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
स्टँम्प ड्यूटी रद्द करण्याच्या या निर्णयामुळे अवघ्या पाचशे रुपयांच्या स्टँम्प पेपरवर वडिलांची मालमत्ता मुलाला किंवा मुलाची मालमत्ता वडिलांना हस्तांतरित करणं शक्य होणार आहे.
आतापर्यंत या हस्तांतरणावर पाच टक्के स्टँम्प ड्यूटी महसूल विभागात जमा करावी लागत होती. पण या निर्णयाने आता रक्ताच्या नात्यांतलं हस्तातरण जवळपास मोफत होणार आहे.
-Regards
CA. C. V. PAWAR
No comments:
Post a Comment